IPL : मुंबई इंडियन्स या तीन खेळाडूंना पुन्हा रिटेन करणार?

27 जानेवारीला आयपीएलच्या आगामी मोसमासाठी लिलाव होईल.

IPL : मुंबई इंडियन्स या तीन खेळाडूंना पुन्हा रिटेन करणार?

मुंबई : आगामी आयपीएलच्या मोसमात मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा आणि पंड्या बंधू हार्दिक आणि क्रुणलला रिटेन करण्याची शक्यता आहे. तर दिल्ली डेअरडेव्हिल्स ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरला कायम करणार असल्याची माहिती आहे. 27 जानेवारीला आयपीएलच्या आगामी मोसमासाठी लिलाव होईल.

खेळाडूंना रिटेन करण्याची अखेरची मुदत 4 जानेवारी आहे. मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिटेन करण्यासाठी उत्सुक असेल, कारण त्याच्या नेतृत्त्वात संघाने तीन आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. हार्दिक पंड्या मॅच विनर खेळाडू आहे, तर तिसरा खेळाडू क्रुणाल असू शकतो, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई सुपर किंग्जही पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. सीएसकेने महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जाडेजा यांनी रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनबाबत अजून निर्णय झाला नसल्याची माहिती आहे.

''सीएसकेने आतापर्यंत लिस्ट सादर केलेली नाही, मात्र धोनी आणि रैनाला रिटेन करु हे वेगळं सांगायची गरज नाही. तिसरं नाव जाडेजाचं असू शकतं'', अशी माहिती सीएसकेच्या रणनितीची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने दिली.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: IPL 2018 Mumbai indians can retain rohit and pandya brothers
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV