IPL 2018 : मुंबईचा सलग दुसरा पराभव, हैदराबादचा एका विकेटने विजय

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सवर एक विकेट राखून विजय मिळवला.

IPL 2018 : मुंबईचा सलग दुसरा पराभव, हैदराबादचा एका विकेटने विजय

मुंबई : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सवर एक विकेट राखून विजय मिळवला. आयपीएलच्या अकराव्या मोसमात मुंबईला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात मुंबईनं हैदराबादला 20 षटकात 148 धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादच्या प्रभावी गोलंदाजीमुळे मुंबईला 20 षटकात आठ बाद 147 धावांची मजल मारता आली होती.
IPL 2018 : चेन्नई सुपरकिंग्सचा मुंबई इंडियन्सवर एका विकेटने विजय

मुंबई इंडियन्सच्या मयंक मार्कंडे आणि मुस्तफिजूर रेहमानच्या प्रभावी माऱ्यासमोर हैदराबादची नऊ बाद 137 अशी दाणादाण उडाली होती. पण हैदराबादच्या दीपक हुडानं संयमी खेळी करत यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्सला सलग दुसरा विजय मिळवून दिला.

हुडानं नाबाद 32 धावांची खेळी केली. तर शिखर धवननं आठ चौकारांसह 45 धावा फटकावल्या.

महेंद्रसिंग धोनीच्या 'चेन्नई सुपर किंग्स'ने शनिवारी 'मुंबई इंडियन्स'चा एका विकेटने सनसनाटी पराभव केला होता. केदार जाधवने एक चेंडू राखून चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: IPL 2018 SRH vs MI : Mumbai Indians beat by Hyderabad Sunrisers by one wicket latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV