VIDEO: मैदानावरील 'सुपरमॅन', भन्नाट कॅचनं सारेच थक्क!

VIDEO: मैदानावरील 'सुपरमॅन', भन्नाट कॅचनं सारेच थक्क!

नवी दिल्ली: दिल्ली डेअरडेविल्स विरुद्धच्या सामन्यात पुणे भले 7 धावांनी मात खावी लागली तरी, पुण्याचा स्टार खेळाडू बेन स्टोक्सनं मात्र चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. फक्त गोलंदाजी किंवा फलंदाजीमध्येच स्टोक्स चांगली कामगिरी करतो असं अजिबात नाही. तर फिल्डिंगमध्येही त्यानं भन्नाट कामगिरी केली आहे.

दिल्लीच्या फलंदाजीवेळी 20व्या ओव्हरमध्ये पाचव्या चेंडूवर स्टोक्सनं सीमारेषेजवळ एक भन्नाट कॅच पकडून सगळ्यांना चकीत केलं. शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाज मोहम्मद शमीनं उनाडकटच्या गोलंदाजीवर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. शमीनं मारलेला फटका पाहून असं वाटलं की चेंडू सीमारेषेपलीकडे जाईल. पण सीमारेषेवर असणाऱ्या स्टोक्सनं अप्रतिम फिल्डिंग करत फक्त 6 धावाच वाचवल्या नाही तर त्यानं एक विकेटही मिळवून दिली.

हा कॅच पाहून मैदानावरील प्रेक्षक अक्षरश: थक्क झाले.याशिवाय स्टोक्सनं गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. त्यानं 4 ओव्हरमध्ये फक्त 31 धावा देऊन दोन गडी टिपले. तर फलंदाजी करताना त्याने 25 चेंडूत 33 धावा केल्या. यामध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV