धोनी, रैनाचं सीएसकेत कमबॅक, बंगळुरुने गेलला सोडलं

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने स्फोटक फलंजाज ख्रिस गेलला रिटेन केलेलं नाही. सरफराज अहमदला कमी किंमतीत रिटेन केलं आहे.

धोनी, रैनाचं सीएसकेत कमबॅक, बंगळुरुने गेलला सोडलं

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग नव्या मोसमासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. सर्व आयपीएल संघांनी आपापली रिटेंशन यादी सादर केली आहे. चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जाडेजा आणि सुरेश रैनाला कायम केलं आहे. तर मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमरा यांना कायम केलं.

विशेष म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने स्फोटक फलंजाज ख्रिस गेलला रिटेन केलेलं नाही. सरफराज अहमदला कमी किंमतीत रिटेन केलं आहे.

कोणत्या संघात कोणते खेळाडू रिटेन?

 • मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमरा

 • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – आतापर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकता न आलेल्या आरसीबीने कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि सरफराज अहमदला रिटेन केलं. ख्रिस गेलसारखा स्फोटक फलंदाज आरसीबीने सोडला आहे.

 • चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्र सिंह धोनी, रवींद्र जाडेजा आणि सुरेश रैना

 • दिल्ली डेअरडेव्हिल्स – ऑलराऊंडर ख्रिस मॉरिस, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर

 • कोलकाता नाईट रायडर्स – कोलकात्याने कर्णधार गौतम गंभीरला सोडलं आहे. सुनील नारायण आणि आंद्रे रसलला कायम केलं आहे.

 • राजस्थान रॉयल्स – स्टीव्ह स्मिथ

 • सनरायझर्स हैदराबाद – डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वर कुमार

 • किंग्ज इलेव्हन पंजाब – अक्षर पटेल

 • रिटेनचे नियम


ipl

आयपीएलच्या नव्या मोसमात केवळ पाचच खेळाडूंना कायम केलं जाऊ शकतं. याची विभागणी रिटेंशन आणि राईट टू मॅच अशा दोन श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. या नियमानुसार संघ कोणत्याही एक श्रेणीतून जास्तीत जास्त तीन खेळाडूंना कायम करु शकतो.

जर एखाद्या संघाने रिटेंशन पॉलिसीनुसार दोन खेळाडूंचा समावेश केला, तर त्यांच्याकडे राईट टू मॅचचे तीन कार्ड उरतील. राईट टू मॅचचा वापर आयपीएल लिलावात करता येणार आहे, जो 27 आणि 28 जानेवारी रोजी होईल.

रिटेन खेळाडूंची किंमत

रिटेनसाठी तीन खेळाडूंची वेगवेगळी किंमत ठेवण्यात आली आहे. ज्यामध्ये जास्तीत जास्त 33 कोटी रुपयांचा वापर केला जाऊ शकतो.

 • पहिला खेळाडू – 15 कोटी रुपये

 • दुसरा खेळाडू – 11 कोटी रुपये

 • तिसरा खेळाडू – 7 कोटी रुपये


फ्रेंचायजीने केवळ दोन खेळाडूंना रिटेन केलं तर..

पहिला खेळाडू – 15 कोटी रुपये

दुसरा खेळाडू – 8.5 कोटी रुपये

आयपीएल फ्रेंचायजीने एकाच खेळाडूला रिटेन केलं तर जास्तीत जास्त 12.5 कोटी रुपये देता येतील.

कोणत्या खेळाडूंना रिटेन करता येऊ शकतं?

रिटेन पॉलिसीनुसार, भारतीय संघातील तीन खेळाडू (कॅप्ड प्लेयर), दोन परदेशी खेळाडू आणि दोन अनकॅप खेळाडूंना रिटेन करता येऊ शकतं.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: IPL retention list CSK choose dhoni jadeja and raina
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV