रक्षाबंधन सेल्फीनंतर इरफान पठाण सोशल मीडियावर ट्रोल

कथित धर्मरक्षकांकडून पठाणला बरेचदा संस्कृती रक्षणाचे उपदेशपर डोस पाजले जातात. त्याचप्रमाणे रक्षाबंधन साजरा करणाऱ्या पठाणला हिंदू सण साजरे न करण्याचा सल्ला देण्यात आला.

रक्षाबंधन सेल्फीनंतर इरफान पठाण सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई : रक्षाबंधन साजरा केल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर क्रिकेटपटू इरफान पठाणला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. गेल्या काही दिवसात पठाण दुसऱ्यांदा ट्रोल होत आहे.

इरफान पठाणसाठी ट्रोलिंग हा काही नवीन विषय नाही. कथित धर्मरक्षकांकडून पठाणला बरेचदा संस्कृती रक्षणाचे उपदेशपर डोस पाजले जातात. त्याचप्रमाणे रक्षाबंधन साजरा करणाऱ्या पठाणला हिंदू सण साजरे न करण्याचा सल्ला देण्यात आला. मुस्लिम पंरपरेनुसार रक्षाबंधन मान्य नसल्याचं काही जणांनी फेसबुकवर म्हटलं.इरफानने काही दिवसांपूर्वी पत्नी सफा बेगसोबत फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सफा आपला चेहरा हातानं झाकत असल्याचं दिसत होतं. यावरुनच अनेकांनी ट्रोल करणं सुरु केलं. सफाचा चेहरा दिसत असल्यानं इरफानवर अनेकांनी टीका केली आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV