षटकार वाचवण्यासाठी बुमराची 'हाय जम्प', उडी घेऊन चेंडू अडवला

या सर्वात अविस्मरणीय क्षण ठरला तो जसप्रिम बुमराने षटकार अडवण्याचा केलेला प्रयत्न.

षटकार वाचवण्यासाठी बुमराची 'हाय जम्प', उडी घेऊन चेंडू अडवला

जोहान्सबर्ग : टीम इंडियाने जोहान्सबर्गच्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 28 धावांनी धुव्वा उडवला. भारताने या विजयासह तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं.

या सामन्यात अगोदर फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी अक्षरशः रडकुंडीला आणलं. सोबतच भारताचं क्षेत्ररक्षणही उल्लेखनीय होतं. या सर्वात अविस्मरणीय क्षण ठरला तो जसप्रीत बुमराने षटकार अडवण्याचा केलेला प्रयत्न.

सातव्या षटकात हार्दिक पंड्या गोलंदाजी करत होता. डेव्हिड मिलरने मारलेला एक गगनचुंबी शॉट बुमराने मोठ्या कौशल्याने अडवला. मोठी उडी घेत त्याने चेंडू पकडला आणि बाहेर फेकला. मात्र ही उडी घेण्याअगोदरच त्याच्या पायांचा स्पर्श सीमारेषेला झाला होता. त्यामुळे बुमराचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. मात्र मैदानातील सर्व प्रेक्षकांनी आणि भारतीय संघाच्या खेळाडूंनी बुमराच्या प्रयत्नांना दाद दिली.

पाहा व्हिडीओ :

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: jasprit bumrah saved six by high jump
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV