कबड्डीपटू निलेश शिंदेची प्रेक्षकाला बेदम मारहाण

स्वस्तिक क्रीडा मंडळ पराभूत झाल्यानंतर संघ प्रशिक्षक आणि प्रो कबड्डी खेळाडू निलेश शिंदे यांने विजयी संघाचं अभिनंदन करणाऱ्या एका प्रेक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

कबड्डीपटू निलेश शिंदेची प्रेक्षकाला बेदम मारहाण

मुंबई : मुंबईतील कुर्ला इथं कबड्डी उपनगर ज्यनिअर निवड चाचणीच्या अंतिम सामन्याला गालबोट लागलं आहे. स्वस्तिक क्रीडा मंडळ पराभूत झाल्यानंतर संघ प्रशिक्षक आणि प्रो कबड्डी खेळाडू निलेश शिंदे यांने विजयी संघाचं अभिनंदन करणाऱ्या एका प्रेक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

सतीश सावंत असं या प्रेक्षकाचं नाव असून तो उत्कर्ष क्रीडा मंडळाचा खेळाडू आहे. उपनगर जिल्हा असोसिएशनचे सहसचिव प्रताप शेट्टी यांनीही या प्रेक्षकाला मारहाण केल्याचंही समजतं आहे.

complaint

दरम्यान, याप्रकरणी नेहरू नगर पोलीस ठाण्यामध्ये या गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या सर्व प्रकारानंतर कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप करण्यात येत आहेत.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kabaddi player Nilesh Shinde beaten to spectator latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV