वन डे मालिकेतून केदार जाधव आऊट, या खेळाडूला संधी

केदार जाधवच्या जागी वॉशिंग्टन सुंदर या युवा खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

वन डे मालिकेतून केदार जाधव आऊट, या खेळाडूला संधी

मुंबई : टीम इंडियाचा शिलेदार केदार जाधव श्रीलंकेविरुद्ध सुरु होत असलेल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला मुकणार आहे. दुखापतीमुळे त्याला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर या युवा खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

श्रीलंकेविरुद्ध कसोटीतील विक्रमी मालिका विजयानंतर आता तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या या मालिकेतील पहिला सामना उद्या धरमशालामध्ये खेळवला जाणार आहे.

या मालिकेत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची धुरा रोहित शर्मावर सोपवण्यात आली आहे. हार्दीक पंड्या आणि भुवनेश्वर कुमारचं संघात पुनरागमन झालं असून कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे आणि महेन्द्रसिंग धोनी या अनुभवी शिलेदारांवर प्रामुख्याने फलंदाजीची मदार राहील.

भारत आणि श्रीलंकेदरम्यान आजपर्यंत भारतात झालेल्या नऊ वन डे मालिकांपैकी आठ मालिका टीम इंडियाने आपल्या खिशात घातल्या आहेत तर एक मालिका अनिर्णित राहिली आहे. त्यामुळे कसोटी मालिकेनंतर आता वन डेतही श्रीलंकेला मात देण्यासाठी टीम इंडिया उत्सुक असेल.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kedar jadhav out from one day series against Sri lanka due to injury
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV