धोनीची एकाकी झुंज अपयशी, चेन्नईचा पराभव

या सामन्यात पंजाबने चेन्नईला विजयासाठी 198 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद 79 धावांच्या खेळीनंतरही चेन्नईचे प्रयत्न चार धावांनी कमी पडले.

धोनीची एकाकी झुंज अपयशी, चेन्नईचा पराभव

मोहाली : किंग्स इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या चुरशीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर अवघ्या चार धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पंजाबने चेन्नईला विजयासाठी 198 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

मात्र महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद 79 धावांच्या खेळीनंतरही चेन्नईचे प्रयत्न चार धावांनी कमी पडले. धोनीच्या या खेळीत सहा चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता.

त्याआधी ख्रिस गेलने यंदाच्या मोसमातला आपला पहिलाच सामना खेळताना दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याने 33 चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांसह 63 धावा फटकावल्या. गेलच्या या खेळीमुळे किंग्स इलेव्हनला 20 षटकांत सात बाद 197 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Kings eleven Punjab beat Chennai super kings by 4 runs
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV