तिसऱ्या कसोटीत रहाणेला संधी देऊन विराट चूक सुधारणार?

अखेरचा सामना जिंकून व्हाईटवॉश टाळण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहिल.

तिसऱ्या कसोटीत रहाणेला संधी देऊन विराट चूक सुधारणार?

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला अखेरचा सामना 24 जानेवारी रोजी जोहान्सबर्गमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडिया या मालिकेत अगोदरच 2-0 ने पिछाडीवर आहे, मात्र अखेरचा सामना जिंकून व्हाईटवॉश टाळण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहिल.

यापूर्वी अनेक निर्णयांमुळे कर्णधार विराट कोहलीवर टीका झाली होती. मात्र पहिल्या दोन सामन्यांमध्ये संधी न मिळालेल्या अजिंक्य रहाणेसोबत यावेळी विराट कोहलीने नेटमध्ये सराव केला. या काळात विराट आणि अजिंक्य रहाणे यांच्यात जवळपास 20 मिनिटे चर्चाही झाली.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये विराटने अजिंक्य रहाणेच्या जागी रोहित शर्माला संधी दिली होती. मात्र फलंदाजीमध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरला. अजिंक्य रहाणे भारतीय संघाचा उपकर्णधारही आहे आणि उपकर्णधारालाच सलग दोन सामन्यांमध्ये संधी न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

यापूर्वी अजिंक्य रहाणेने दक्षिण आफ्रिकेत शानदार कामगिरी केलेली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेत जवळपास 54 च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात संघ व्यवस्थापन रहाणेला संधी देईल, असा अंदाज लावला जात आहे. याशिवाय दिनेश कार्तिक, नवदीप सैनी आणि शार्दूल ठाकूर यांनीही सराव सत्रात सहभाग घेतला.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV