VIDEO : महेंद्रसिंह धोनीचा साक्षीसमोर भन्नाट डान्स!

मैदानावर कायम कूल दिसणारा धोनी मैदानाबाहेर तितकाचा मजा-मस्ती करणारा आहे. धोनी आपली पत्नी साक्षीसमोर भन्नाट डान्स करत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

VIDEO : महेंद्रसिंह धोनीचा साक्षीसमोर भन्नाट डान्स!

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं आपल्या मैदानावरील कारनाम्यानं अनेकदा सुखद धक्के दिले आहेत. कर्णधार असताना त्याने घेतलेले निर्णय किंवा विकेटकीपिंग करताना चपळाईनं केलेले स्टम्पिंग किंवा रनआऊट असो. सारं काही अफलातून. पण आता धोनीचा एक भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

मैदानावर कायम कूल दिसणारा धोनी मैदानाबाहेर तितकाचा मजा-मस्ती करणारा आहे. धोनी आपली पत्नी साक्षीसमोर भन्नाट डान्स करत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे धोनीचा नवा अवतार त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या व्हिडीओबाबत फार काही माहिती समोर आलेली नाही. हा व्हिडीओ नेमका कुणी शूट केला आहे याबाबतही माहिती मिळू शकलेली नाही.

व्हिडीओमध्ये धोनी पत्नी साक्षीसमोर डान्स करत असल्याचं दिसतं आहे. धोनीचा हा डान्स पाहून साक्षीला देखील आपलं हसू लपवणं फार कठीण गेलं.
VIDEO :

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: mahendra singh dhoni dance video viral on social media
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV