मनीष पांडेने घेतलेला झेल पाहून प्रेक्षकही स्तब्ध!

मनीष पांडेने हँड्सकॉम्बचा घेतलेला झेल पाहून मैदानातील सर्व प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले.

मनीष पांडेने घेतलेला झेल पाहून प्रेक्षकही स्तब्ध!

इंदूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत मनीष पांडेच्या बॅटने तर अजून कमाल दाखवलेली नाही. मात्र त्याने तिसऱ्या वन डेत ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली.

मनीष पांडेने हँड्सकॉम्बचा घेतलेला झेल पाहून मैदानातील सर्व प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले. हा झेल पाहण्यासाठी उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक जागेवर उठून उभे राहिले.

जसप्रीत बुमराच्या षटकात हँड्सकॉम्ब फलंदाजी करत होता. त्याने मारलेला शॉट सीमारेषेच्या बाहेर जाणार होता. मात्र मनीष पांडेने अगोदर चेंडू अडवून तो बाहेर फेकला आणि पुन्हा झेल घेतला.

पाहा व्हिडिओ :

https://twitter.com/Cricvids1/status/911921883662082050

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Manish Pandey मनीष पांडे
First Published:
LiveTV