'मेरे दो अनमोल रतन', कुलदीप, चहलसोबत रोहितचा फोटो

‘मेरे दो अनमोल रतन’ असं कॅप्शन देत रोहित शर्माने या दोघांसोबतचा फोटो शेअर केला आहे.

'मेरे दो अनमोल रतन', कुलदीप, चहलसोबत रोहितचा फोटो

मुंबई : टीम इंडियाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रीलंकेवर 3-0 ने विजय मिळवला. मुंबईतील वानखेडेवर खेळवण्यात आलेल्या अखेरच्या सामन्यात रोहित शर्माच्या भारतीय संघाने श्रीलंकेवर 5 गडी राखून मात केली. फिरकीपटू कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांनी या सामन्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

संपूर्ण टी-20 आणि वन डे मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावणारे कुलदीप आणि चहल हे आता भारतीय संघाचा अविभाज्य घटक बनले आहेत. रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांची जागा त्यांनी भरुन काढली आहे. ‘मेरे दो अनमोल रतन’ असं कॅप्शन देत रोहित शर्माने या दोघांसोबतचा फोटो शेअर केला आहे.Mere do Anmol ratan 🎩 @kuldeep_18 @yuzi_chahal23


A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on


चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने आपल्या फिरकीच्या जोरावर श्रीलंकेच्या फलंदाजांना जेरीस आणलं. या टी-20 मालिकेत त्याने दमदार कामगिरी केली. आतापर्यं त्याने केवळ 8 टी-20 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याच्या खात्यात 18.50 च्या सरासरीने 12 विकेट आहेत.

यजुवेंद्र चहलनेही गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघात त्याचं स्थान पक्क केलं आहे. आतापर्यंत खेळलेल्या 14 टी-20 सामन्यात त्याच्या नावावर 26 विकेट्स आहेत. एकाच सामन्यात सहा फलंदाजांना माघारी पाठवण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: mere do anmol ratan rohit shared photo with Kuldeep yadav and yazvendra chahal
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV