कैफच्या सडेतोड उत्तराने पाक ट्रोलरची बोलती बंद!

By: | Last Updated: > Friday, 19 May 2017 12:45 PM
कैफच्या सडेतोड उत्तराने पाक ट्रोलरची बोलती बंद!

मुंबई : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयावर भारताच्या अनेक बड्या व्यक्तींनी आनंद व्यक्त केला. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफनेही याबाबत भारताचं अभिनंदन केलं.

पण कैफच्या ट्वीटनंतर पाकिस्तानमधील अनेक ट्विटराईट्सने ट्रोल केलं. मात्र मोहम्मद कैफनेही चोख प्रत्युत्तर देत त्यांचं तोंड बंद केलं.

अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देऊ नये, असा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गुरुवारी दिला. या निर्णयानंतर संपूर्ण देशात आनंदाची लाट पसरली.

आयसीजेच्या निर्णयानंतर मोहम्मद कैफने ट्वीट केलं. भारताचं अभिनंदन, आंतरराष्ट्रीय न्यायालायाचे आभार. सत्याचा विजय झाला, असं कैफने ट्वीटमध्ये म्हटलं.

मोहम्मद कैफचं हे ट्वीट पाकिस्तानच्या एका ट्विपलच्या फारच मनाला लागलं. आमीर अक्रम नावाच्या यूझरने कैफच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना नावातून मोहम्मद शब्द हटवण्यास सांगितलं.

यावर कैफनेही चोख प्रत्युत्तर दिलं. “जर मी भारताच्या विजयाचं समर्थन केलं तर मला माझ्या नावातून मोहम्मद हटवायला हवं? मला माझ्या नावावर अभिमान आहे. आमीरचा अर्थ आहे, जीवनात परिपूर्ण. तुलाही त्याची गरज आहे.”

मोहम्मद कैफने यानंतर आणखी एक ट्वीट करुन लिहिलं की, कोणीही कोणत्या धर्माचा ठेकेदार नाही. ठेकेदारांचा कोणाच्याही नावावर कॉपीराईट नाही. भारत सर्वसमावेशक आणि सहिष्णु देश आहे.

First Published:

Related Stories

'सचिन ए बिलीयन ड्रीम्स'ची पहिल्या दिवशी 8.40 कोटींची कमाई
'सचिन ए बिलीयन ड्रीम्स'ची पहिल्या दिवशी 8.40 कोटींची कमाई

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक ‘सचिन ए बिलीयन

... म्हणून सचिनने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं!
... म्हणून सचिनने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं!

मुंबई : सिनेमाच्या प्रमोशनसाठी कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये

तिकीट स्वस्त, 'सचिन : ए बिलियन ड्रीम्स' राज्यात टॅक्स फ्री
तिकीट स्वस्त, 'सचिन : ए बिलियन ड्रीम्स' राज्यात टॅक्स फ्री

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित ‘सचिन

विराट कोहली नव्या लूकसह लंडनमध्ये दाखल
विराट कोहली नव्या लूकसह लंडनमध्ये दाखल

लंडन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नव्या लूकसह चॅम्पियन्स

रिव्ह्यू : सचिन: अ बिलियन ड्रीम्स
रिव्ह्यू : सचिन: अ बिलियन ड्रीम्स

आपल्या भूतकाळाला जोडणारे, त्याच्याशी नातं सांगणारे खूप कमी

पहिल्या वनडेत इंग्लंडचा द. आफ्रिकेवर दणदणीत विजय
पहिल्या वनडेत इंग्लंडचा द. आफ्रिकेवर दणदणीत विजय

हेडिंग्ले (इंग्लंड): कर्णधार इऑन मॉर्गनच्या शतकी खेळीच्या जोरावर

बांगलादेशकडून न्यूझीलंडचा 5 विकेट राखून धुव्वा
बांगलादेशकडून न्यूझीलंडचा 5 विकेट राखून धुव्वा

डब्लिन (आयर्लंड) : बांगलादेशने आयर्लंडमधल्या तिरंगी मालिकेच्या

आयसीसी क्रिकेट समितीकडून टी-20 मध्येही DRS ची शिफारस
आयसीसी क्रिकेट समितीकडून टी-20 मध्येही DRS ची शिफारस

नवी दिल्ली : वन डे आणि कसोटी क्रिकेटप्रमाणे टी-20 क्रिकेटमध्येही

टीम इंडिया इंग्लंडमध्ये, केदार जाधव आणि रोहित शर्मा भारतातच!
टीम इंडिया इंग्लंडमध्ये, केदार जाधव आणि रोहित शर्मा भारतातच!

मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल

कुंबळेवर BCCI नाराज, टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु
कुंबळेवर BCCI नाराज, टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु

मुंबई : बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी