... तेव्हा धोनीने सांगितलं होतं, ही चूक परत करु नको : पंड्या

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या सामन्यात आपल्याला माजी कर्णधार आणि टीम इंडियाचा विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीने मदत केली, असं तो म्हणाला.

... तेव्हा धोनीने सांगितलं होतं, ही चूक परत करु नको : पंड्या

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा ऑलराऊंडर म्हणून ओळख मिळवलेला खेळाडू हार्दिक पंड्याने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातील काही आठवणींना उजाळा दिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या सामन्यात आपल्याला माजी कर्णधार आणि टीम इंडियाचा विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीने मदत केली, असं तो म्हणाला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात दबावात असताना धोनीने जवळ येऊन समज दिली. त्यानंतर शांतपणे खेळ केला आणि स्वतःमध्ये बदल घडवला, असं पंड्याने सांगितलं. एका वेब सीरिजदरम्यान बोलताना त्याने हा किस्सा सांगितला.

आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिल्याच षटकात पंड्याने 21 धावा दिल्या होत्या. शिवाय ख्रिस लीनसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याला आयसीसीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्यामुळे समजही देण्यात आली होती.

''तो क्षण एका वाईट स्वप्नासारखा होता. एका षटकात 21 धावा दिल्यानंतर तेव्हा काहीही समजत नव्हतं. मात्र धोनी जवळ आला आणि 'आणखी एक ओव्हर टाकशील का?' विचारलं. 1.1 षटकानंतर 28 धावा दिल्या होत्या. पण त्यानंतरच्या षटकांमध्ये केवळ 7 ते 8 धावा दिल्या. त्यानंतरही धोनी काहीही म्हणाला नाही. धोनी फक्त एवढंच म्हणाला की, 'एका षटकानंतर तू चांगली गोलंदाजी करशील हे मला माहित होतं'', अशी आठवण पंड्याने सांगितली.

''ख्रिस लीनला बाद केल्यानंतर प्रचंड उत्साहात होतो आणि सेलिब्रेशन करत होतो. मात्र धोनी म्हणाला, की 'तू हे अखेरचं करत आहेस. पुन्हा असं करशील तर तुला दंड होईल आणि खेळण्याची संधी मिळणार नाही'', असंही पंड्याने सांगितलं.

''शिधर धवनमुळे हेअर स्टाईल बदलावी लागली''

हेअरस्टाईलबाबतही पंड्याला प्रश्न विचारण्यात आला. ''शिखर धवनमुळे ही हेअरस्टाईल करावी लागली, असं त्याने सांगितलं. शिखरला थोडेसे केस कापायला सांगितले होते, मात्र त्याने जास्त कापले. त्यामुळे अशी हेअरस्टाईल करावी लागली'', असा किस्साही पंड्याने शेअर केला.

'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या वेब सीरिजमध्ये अनेक क्रिकेटपटूंनी हजेरी लावली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही या शोमध्ये आला होता.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: MS dhoni did guide me in my debue match says hardik pandya
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV