सलग 11 वर्ष, 300 वन डे, सतत टॉप 10 फलंदाजांच्या यादीत

2007 ते 2017 या काळात फक्त वर्ष बदलले, मात्र धोनीने टॉप 10 मधील स्थान कधीही सोडलं नाही.

सलग 11 वर्ष, 300 वन डे, सतत टॉप 10 फलंदाजांच्या यादीत

मुंबई : सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, संघ, अष्टपैलू खेळाडू यांची रँकिंग आयसीसीकडून दर 15 ते 20 दिवसांना जारी केली जाते. सर्वात चांगली कामगिरी करणारा खेळाडू या यादीतून ओळखला जातो.

आयसीसी वन डे फलंदाजांच्या यादीत असा एक खेळाडू आहे, जो गेल्या 11 वर्षांपासून टॉप 10 फलंदाजांमध्ये आहे. तो दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आहे. 2007 ते 2017 या काळात फक्त वर्ष बदलले, मात्र धोनीने टॉप 10 मधील स्थान कधीही सोडलं नाही.

धोनी 2007 पासून आयसीसी रँकिंगमध्ये फलंदाजांच्या यादीत टॉप 10 मध्ये आहे. मात्र 2017 मध्ये गेल्या अकरा वर्षात पहिल्यांदाच धोनीची या यादीतून बाराव्या स्थानावर घसरण झाली.

धोनीने आतापर्यंत 307 वन डे सामने खेळले आहेत. यातील 263 इनिंगमध्ये त्याने 51 च्या सरासरीने 9758 धावा केल्या आहेत. शिवाय धोनी हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. धोनीच्याच नेतृत्त्वात भारताने 2011 चा आयसीसी विश्वचषक आणि 2007 चा आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकला होता.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV