'या' क्रिकेटरची प्रिया वारियर मोठी फॅन

18 वर्षीय प्रिया वारियर सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. पण आता तिला आवडणारा क्रिकेटर कोण याचीही चर्चा सुरु झाली आहे.

'या' क्रिकेटरची प्रिया वारियर मोठी फॅन

मुंबई : प्रिया वारियर ही खऱ्या अर्थाने एका रात्रीत स्टार बनली. तिच्या एक अदा लाखो-करोडो लोकांना घायाळ करुन गेली आहे. मूळची केरळमधील 18 वर्षीय प्रिया सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. पण आता तिला आवडणारा क्रिकेटर कोण याचीही चर्चा सध्या सुरु झाली आहे.

सध्या प्रत्येकाच्या चर्चेचा विषय प्रिया वारियरच्या अदा हाच आहे. फक्त दक्षिण भारतातच नाही तर देशभरात तिचे चाहते झाल्याचे स आता दिसून येत आहे.

आपल्या खास अदांनी लाखो लोकांना घायाळ करणारी प्रिया ही मात्र, क्रिकेटची मोठी चाहती आहे. त्यामुळे एक क्रिकेटरही तिच्या खूपच आवडीचा आहे.

धोनी 2017 च्या सुरुवातीला भारताच्या वन डे आणि टी ट्वेण्टी संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला

एका न्यूज चॅनलशी बातचीत करताना प्रियाने सांगितलं की, तिला भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी प्रचंड आवडतो. त्यामुळे आता प्रियाच्या या उत्तरावर नेटीझन्स कसं रिअॅक्ट करतात हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, प्रियाने एबीपी न्यूजशी बोलताना असंही सांगितलं की, तिला बॉलिवूडची पद्मावती म्हणजेच दीपिका पदुकोणही खूप आवडते आणि तिच्यासोबत काम करण्याची इच्छाही असल्याचं तिने सांगितलं.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: MS Dhoni is priya prakash varriers favourite cricketer latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV