फुटबॉलच्या मैदानावरही धोनीचा जलवा!

धोनी क्रिकेटच्या मैदानावर कायमच हिरो असतो. पण आता फक्त फुटबॉलच्या मैदानावरही तो हिरो ठरला आहे.

फुटबॉलच्या मैदानावरही धोनीचा जलवा!

मुंबई :  क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीनं आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. क्रिकेटच्या मैदानावर तो कायमच हिरो असतो. पण आता फक्त फुटबॉलच्या मैदानावरही तो हिरो ठरला आहे.

एका चॅरिटी फुटबॉल सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हट्र्स संघानं अभिषेक बच्चनच्या आल स्टार्स संघावर तब्बल 7-3 एवढ्या मोठ्या गोल फरकानं विजय मिळवला.

virat kohli

क्रिकेटप्रमाणेच फुटबॉल सामन्यातही धोनीनं आपल्यातील चुणूक दाखवून दिली. त्यानं एका शानदार फ्री किकवर पहिला गोल केला. त्याच्या या भन्नाट फ्री क्रीक उत्तर गोलकिपर मार्क रॉबिन्सनकडेही नव्हतं. या सामन्यात धोनीनं दोन गोल केले. त्यामुळे त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

दरम्यान, या सामन्यात कोहलीनंही आपल्या चाहत्यांना नाराज केलं नाही. त्यानं देखील या सामन्यात एक गोल झळकावून आपणही काही कमी नाही हे दाखवून दिलं.

भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार पी. आर श्रीजेश आणि टेनिसपटू रोहन बोपन्ना हे देखील कोहलीच्या संघात होते.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV