IPL: मुंबईची फायनलमध्ये धडक, कोलकातावर 6 गडी राखून विजय

By: | Last Updated: > Friday, 19 May 2017 11:48 PM
IPL: मुंबईची फायनलमध्ये धडक, कोलकातावर 6 गडी राखून विजय

फाईल फोटो

बंगळुरु: आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या विजेतेपदासाठी रविवारी पुण्याचा अंतिम सामना मुंबईशी होईल. बंगळुरूत खेळवण्यात आलेल्या क्वालिफायर टू सामन्यात मुंबईनं कोलकात्याचा सहा विकेट्सनी पराभव केला.

या सामन्यात मुंबईच्या प्रभावी आक्रमणासमोर कोलकात्याच्या फलंदाजांनी अवघ्या 107 धावांत लोटांगण घातलं. त्यामुळं मुंबईसमोर विजयासाठी 108 धावांचंच लक्ष्य होतं.

कर्णधार रोहित शर्मा आणि कृणाल पंड्यानं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 54 धावांच्या भागिदारीनं मुंबईला विजयपथावर नेलं. कृणाल पंड्यानं 30 चेंडूंत आठ चौकारांसह नाबाद 45 धावांची आणि रोहित शर्मानं 24 चेंडूंत 26 धावांची खेळी केली.

त्याआधी, मुंबईच्या कर्ण शर्मानं 16 धावांत चार आणि जसप्रीत बुमरानं सात धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडून कोलकात्याला गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली. मिचेल जॉन्सननं 28 धावांत दोन विकेट्स काढून त्यांना छान साथ दिली.

सूर्यकुमार यादव आणि इशांक जग्गी यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या 56 धावांच्या भागिदारीमुळं कोलकात्याला 107 धावांची मजल मारता आली. पण क्वालिफायर टूचा सामना जिंकण्यासाठी ती धावसंख्या पुरेशी ठरली नाही.

First Published:

Related Stories

प्रसिद्ध टेनिसस्टार बोरिस बेकर दिवाळखोर घोषित
प्रसिद्ध टेनिसस्टार बोरिस बेकर दिवाळखोर घोषित

लंडन : टेनिस चॅम्पियन बोरिस बेकरला कोर्टाने दिवाळखोर घोषित केलं

कुंबळेच्या आरोपानंतर विराट कोहली काय बोलणार?
कुंबळेच्या आरोपानंतर विराट कोहली काय बोलणार?

मुंबई: टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी करार वाढवण्यास

पाकिस्तानच्या अझर अलीकडून कोहली, धोनी, युवराजचे आभार!
पाकिस्तानच्या अझर अलीकडून कोहली, धोनी, युवराजचे आभार!

मुंबई : मैदानात भारत आणि पाकिस्तान प्रतिस्पर्धी आहेत, पण

कुंबळेसारख्या प्रशिक्षकाला विरोध करणाऱ्या खेळाडूला हाकला: गावसकर
कुंबळेसारख्या प्रशिक्षकाला विरोध करणाऱ्या खेळाडूला हाकला: गावसकर

मुंबई: अनिल कुंबळेसारख्या कडक शिस्तीच्या पण रिझल्ट देणाऱ्या

'बाप कौन है' म्हणणाऱ्या पाकिस्तानी चाहत्याला मैदानाबाहेर चोपलं!
'बाप कौन है' म्हणणाऱ्या पाकिस्तानी चाहत्याला मैदानाबाहेर चोपलं!

लंडन : टीम इंडियाचा दारुण पराभव करत पाकिस्तानी टीमने चॅम्पियन्स

युवराज आणि धोनीबाबत निर्णय घेण्याची वेळ : राहुल द्रविड
युवराज आणि धोनीबाबत निर्णय घेण्याची वेळ : राहुल द्रविड

मुंबई : 2019 चा विश्वचषक पाहता युवराज सिंह आणि महेंद्र सिंह धोनी यांची

पाकिस्तानी खेळाडू मालामाल, रोख रकमेसह जमिनीही इनाम
पाकिस्तानी खेळाडू मालामाल, रोख रकमेसह जमिनीही इनाम

इस्लामाबाद: चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला हरवणारा सरफराज अहमदचा

अनिल कुंबळेचं राजीनामा पत्र जसंच्या तसं
अनिल कुंबळेचं राजीनामा पत्र जसंच्या तसं

मुंबई : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे पदावरुन पायउतार

कोहलीला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप : अनिल कुंबळे
कोहलीला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप : अनिल कुंबळे

मुंबई : भारतीय संघाचे क्रिकेट कोच अनिल कुंबळे यांनी पदाचा राजीनामा

अनिल कुंबळे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार
अनिल कुंबळे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार

मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरुन अनिल कुंबळे पायउतार झाले