मुंबईचे माजी रणजीपटू होशी अमरोलीवाला यांचं वृद्धापकाळाने निधन

मुंबईचे माजी रणजीपटू होशी अमरोलीवाला यांचं शुक्रवारी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते.

मुंबईचे माजी रणजीपटू होशी अमरोलीवाला यांचं वृद्धापकाळाने निधन

मुंबई : मुंबईचे माजी रणजीपटू होशी अमरोलीवाला यांचं शुक्रवारी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते.

अमरोलीवाला यांनी 44 प्रथम दर्जाच्या सामन्यांमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यात 35 रणजी सामन्यांचा समावेश होता. अमरोलीवाला यांनी 44 सामन्यांमध्ये 44.55 च्या सरासरीनं 1782 धावांचा रतीब घातला आहे. त्यांनी लेग स्पिन गोलंदाजी करून 14 विकेट्सही घेतल्या आहेत.

1958-59 मध्ये मुंबई आणि बंगाल संघादरम्यान झालेल्या सामन्यात त्यांनी 139 धावा झळकावत मुंबई संघाला चॅम्पियन बनवले होते.

शिवाय, रणजी चषकात मुंबईच्या संघात त्यांचा पाचवेळा समावेश झाला होता. तर दोन वेळा त्यांच्या उपस्थितीत मुंबईच्या संघाने इराणी ट्रॉफी देखील आपल्या नावावर केली होती.

त्यांच्यासोबत माधव मंत्री, पॉली उम्रीगर, रुसी मोदी, अजीत वाडेकर, दिलीप सरदेसाई, अशोक मंकड, नरेन ताम्हाणे आणि रमाकांत देसाई सारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी क्रिकेट खेळलं होतं.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: mumbai ranji player hoshi amroliwala passed away
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV