मुंबईच्या अंडर 19 संघाची कर्णधार जेमिमाचं खणखणीत द्विशतक

औरंगाबादमध्ये झालेल्या या सामन्यात जेमिमानं 163 चेंडूंमध्ये नाबाद 202 धावांची खेळी उभारली

मुंबईच्या अंडर 19 संघाची कर्णधार जेमिमाचं खणखणीत द्विशतक

औरंगाबाद : मुंबईच्या 19 वर्षांखालील मुलींच्या संघाची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्सनं द्विशतक झळकावत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सौराष्ट्राविरुद्धच्या वन डे सामन्यात जेमिमाने डबल सेंच्युरी ठोकली.

औरंगाबादमध्ये झालेल्या या सामन्यात जेमिमानं 163 चेंडूंमध्ये नाबाद 202 धावांची खेळी उभारली. तिच्या या द्विशतकाला 20 चौकारांचा साज होता. जेमिमानं 52 चेंडूंमध्ये अर्धशतक, तर 83 चेंडूंमध्ये शतकाचा टप्पा पार केला.

jemimah rodrigues

जेमिमाने 116 चेंडूंत दीडशे धावांचा टप्पा ओलांडला होता. जेमिमाच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईनं 347 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर सौराष्ट्रचा डाव 62 धावात गुंडाळून मुंबईनं 285 धावांनी विजय साजरा केला.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Mumbai’s Jemimah Rodrigues hits double century in U-19 One Day match against Saurashtra latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV