माही भाईच्या सल्ल्याने माझं काम सोपं झालं : कुलदीप यादव

'मी पहिल्यांदाच द. आफ्रिकेत खेळत होतो. त्यामुळे मला समजत नव्हतं की, चेंडू कुठे टाकू? माझ्यासाठी हा नवा अनुभव होता. मी माही भाईला विचारत होतो. ते जसं सांगत होते तशीच गोलंदाजी मी करत होतो.'

माही भाईच्या सल्ल्याने माझं काम सोपं झालं : कुलदीप यादव

 

डर्बन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवने 3 बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश केला.

कुलदीपने या यशाचं श्रेय टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दिलं. 'माही भाईच्या सल्ल्याने सामन्यात माझं अर्ध काम सोपं  झालं. विकेटकिपर म्हणून माही भाई जो सल्ला देतात तो खरंच उपयोगी ठरतो.' असं कुलदीप म्हणाला.

द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात कुलदीप आणि यजुवेंद्र चहलने एकूण पाच बळी घेतले. त्यामुळे आफ्रिकेला 50 षटकात 269 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने हा सामना 6 गडी राखत आरामात खिशात घातला. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

'मी पहिल्यांदाच द. आफ्रिकेत खेळत होतो. त्यामुळे मला समजत नव्हतं की, चेंडू कुठे टाकू? माझ्यासाठी हा नवा अनुभव होता. मी माही भाईला विचारत होतो. ते जसं सांगत होते तशीच गोलंदाजी मी करत होतो. ते विकेटच्या मागून सल्ला देतात त्यामुळे माझं काम सोपं होतं.' असं कुलदीप म्हणाला.

'आम्ही तरुण आहोत. त्यामुळे आमच्याकडे तेवढा अनुभव नाही. त्यामुळेच भाई आम्हाला सल्ला देतात.' असंही कुलदीप यावेळी म्हणाला.

कुलदीपने 10 षटकात 34 धावा देत तीन बळी घेतले.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: My job was easy after dhoni’s Advice said kuldeep yadav latets update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV