केवळ 2 धावात अख्खा संघ आऊट, 9 फलंदाजांचा भोपळा

50-50 षटकांच्या या सामन्यात नागालँडचा संघ 17 षटकं खेळून केवळ दोन धावा करू शकला.

केवळ 2 धावात अख्खा संघ आऊट, 9 फलंदाजांचा भोपळा

बीसीसीआयच्या एकोणीस वर्षांखालील मुलींच्या वन डे सुपर लीग सामन्यात केरळनं नागालँडचा डाव अवघ्या दोन धावांत गुंडाळला.

50-50 षटकांच्या या सामन्यात नागालंडचा संघ 17  षटकं खेळून केवळ दोन धावा करू शकला.

त्यानंतर या सामन्यात केरळनं पहिल्याच चेंडूवर विजय साजरा केला आणि नागालँडचा 299 चेंडू आणि दहा विकेट्स राखून धुव्वा उडवला.

या सामन्यात नागालँडच्या दहाही विकेट्स दोन धावांवर पडल्या.

नागालँडने ज्या दोन धावा केल्या, त्यामध्ये एक धाव सलामीची फलंदाज मेनकाने केली, तर दुसरी धाव सहाव्या षटकात वाईडने मिळाली.

केरळच्या 5पैकी 4 गोलंदाजांनी एकही धाव दिली नाही. मिन्नू मणीने 4 विकेट्स घेतल्या. यामध्ये 11 व्या षटकात तीने 3 विकेट्स घेतल्या. मिन्नूने 4-4-0-4 म्हणजेच चार षटकात, चारही निर्धाव, शून्य धावा आणि चार विकेट्स घेतल्या.

नागालँडच्या या लाजीरवाण्या कामगिरीबाबत त्या संघाचे प्रशिक्षक होकैतो झिमोमी म्हणाले, “आमच्या संघाचं प्रशिक्षण सप्टेंबर महिन्यात सुरु झालं. मात्र पाऊस असल्यामुळे प्रशिक्षण होऊच शकलं नाही. मी स्वत: संघाचं प्रशिक्षकपद सप्टेंबरमध्येच स्वीकारलं. मात्र संघबांधणीच होऊ शकली नाही”

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Nagaland score 2 runs in 17 overs. In reply Kerala hit 5 runs in just 1 ball to win in girls under 19
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV