IndvsAus : चेंडू फिरवून फिरवून लायनचं बोट झिजलं!

IndvsAus : चेंडू फिरवून फिरवून लायनचं बोट झिजलं!

रांची:  भारत दौऱ्यातल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये चेंडू फिरवून फिरवून, ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथन लायनच्या उजव्या हाताच्या दुसऱ्या बोटाची त्वचा अक्षरश: सोलून निघाली आहे. पण त्यानंतरही आपण रांचीच्या तिसऱ्या कसोटीत खेळू शकू, असा विश्वास लायनला वाटत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या तिसऱ्या कसोटीला 16 मार्चपासून रांचीत सुरुवात होत आहे.

Nathan Lyon 1

वास्तविक वर्षानुवर्षे ऑफ स्पिन टाकत असलेल्या गोलंदाजांच्या उजव्या हाताच्या दुसऱ्या बोटाची त्वचा जाड झालेली असते. त्यामुळ तिथं इजा होण्याची शक्यता कमी असते. पण बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना लायनच्या उजव्या हाताच्या दुसऱ्या बोटाची त्वचा सोलून निघाली आहे.

लायननं पहिल्या डावात 50 धावांत आठ भारतीय फलंदाजांना माघारी धाडून बंगळुरू कसोटी भारताच्या बाजूनं झुकवली होती. पण दुसऱ्या डावात 33 षटकांत 82 धावा मोजूनही लायनला एकही विकेट मिळाली नव्हती.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: IND vs AUS nathan lyon
First Published:
LiveTV