दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडची भारतावर 40 धावांनी मात

या सामन्यात न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 20 षटकांत 197 धावांचं लक्ष्य दिलं होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडची भारतावर 40 धावांनी मात

राजकोट : न्यूझीलंडने राजकोटच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारताचा 40 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळं कर्णधार विराट कोहलीला 29 व्या वाढदिवसाची भेट मिळू शकली नाही.

या सामन्यात न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 20 षटकांत 197 धावांचं लक्ष्य दिलं होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न अयशस्वी ठरला. न्यूझीलंडने भारताला 20 षटकांत सात बाद 156 धावांत रोखलं.  न्यूझीलंडच्या ट्रेन्ट बोल्टने 34 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडून भारतीय फलंदाजीचा कणा मोडला.

विराट कोहली आणि धोनीने पाचव्या विकेटसाठी केलेल्या 56 धावांच्या भागिदारीने टीम इंडियाच्या आव्हानात धुगधुगी निर्माण केली होती. पण विराट बाद झाला आणि भारताच्या  विजयाची आशा संपुष्टात आली. विराटने ४२ चेंडूंत 8 चौकार आणि एका षटकारासह 65 धावांची खेळी उभारली.

न्यूझीलंडने या सामन्यात वीस षटकांत दोन बाद 196 धावांची मजल मारली. सलामीच्या कॉलिन मनरोने तीन जीवदानांचा फायदा उठवून एक खिंड लावून धरली आणि न्यूझीलंडच्या डावाची बांधणीही केली. त्याने 58 चेंडूंत सात चौकार आणि सात षटकारांसह नाबाद 109 धावांची खेळी उभारली. मनरोने मार्टिन गप्टिलच्या साथीने 105 धावांची सलामी दिली. गप्टिलने 41 चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांसह 45 धावांची खेळी केली.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: New Zealand beat
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV