न्यूझीलंडचा 5-0 ने विजय, पाकिस्तानला क्लीन स्विप

न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघांमधली पाचवी वन डे वेलिंग्टनमध्ये खेळवण्यात आली.

न्यूझीलंडचा 5-0 ने विजय, पाकिस्तानला क्लीन स्विप

वेलिंग्टन : न्यूझीलंडने पाचव्या वन डेत पाकिस्तानवर 15 धावांनी निसटती मात केली. न्यूझीलंडने या विजयासह पाच वन डे सामन्यांची मालिका 5-0 अशी जिंकली. न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघांमधली पाचवी वन डे वेलिंग्टनमध्ये खेळवण्यात आली.

या सामन्यात मार्टिन गप्टिलने झळकावलेल्या शतकाने न्यूझीलंडला 50 षटकांत 271 धावांची मजल मारुन दिली होती. गप्टिलने वन डे कारकीर्दीतलं तेरावं शतक साजरं केलं. त्याने 10 चौकार आणि एका षटकारासह 100 धावांची खेळी उभारली.

त्यानंतर मॅट हेन्री आणि मिचेल सॅन्टनरच्या प्रभावी माऱ्याने पाकिस्तानचा डाव 49 षटकांत 256 धावांत गुंडाळला. हेन्रीने 53 धावांत 4, तर सॅन्टनरने 40 धावांत 3 फलंदाजांना माघारी धाडलं.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: New Zealand beat Pakistan by 5 0
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV