मुन्रोचं टी-20 मध्ये तिसरं शतक, न्यूझीलंडचा विंडीजवर मोठा विजय

याच्या या शतकाने न्यूझीलंडला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात 119 धावांनी दणदणीत विजयही मिळवून दिला.

मुन्रोचं टी-20 मध्ये तिसरं शतक, न्यूझीलंडचा विंडीजवर मोठा विजय

बे ओव्हल : कॉलिन मुन्रोने ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कारकीर्दीतलं तिसरं शतक झळकावून नवा इतिहास घडवला. त्याच्या या शतकाने न्यूझीलंडला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात 119 धावांनी दणदणीत विजयही मिळवून दिला.

ट्वेंन्टी ट्वेंन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिसरं शतक झळकावणारा मुन्रो हा पहिला फलंदाज ठरला. त्याने अवघ्या 53 चेंडूंत 104 धावांची खेळी उभारली. त्यामुळेच न्यूझीलंडला वीस षटकांत पाच बाद 243 धावांची मजल मारता आली. त्यानंतर न्यूझीलंडने विंडीजला सतराव्या षटकात नऊ बाद 124 असं रोखलं.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांमध्ये आतापर्यंत वेस्ट इंडिजचा एव्हिन लुईस, ख्रिस गेल आणि रोहित शर्मा यांच्या नावावर प्रत्येकी दोन शतकं आहेत. मात्र तीन शतकं ठोकणारा कॉलिन मुन्रो हा पहिलाच फलंदाज बनला. रोहित शर्माने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वादळी शतक पूर्ण केलं होतं.

मन्रोशिवाय मार्टिन गप्टिलनेही 63 धावांचं योगदान दिलं. न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या ट्वेंटी ट्वेंटी मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: New Zealand beat West Indies by 119 runs
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV