दीपिका-जोकोविच डेटिंग करायचे, एक्स गर्लफ्रेण्डचा दावा

दीपिका-जोकोविच डेटिंग करायचे, एक्स गर्लफ्रेण्डचा दावा

मुंबई : बॉलिवूडची दिवा दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या कथित प्रेमाच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या असतानाच दोघांच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ग्रँड स्लॅम विजेता टेनिसस्टार नोवाक जोकोविचच्या एक्स गर्लफ्रेण्डने दीपिकाने जोकोसोबत डेटिंग केल्याचा दावा केला आहे.

गेल्या दीड वर्षांपासून नोवाक आणि त्याची पत्नी जेलेना यांच्यात आलबेल नसल्याच्या चर्चा मीडियामध्ये रंगल्या आहेत. त्यातच दिग्गज टेनिसपटू जॉन मॅकएन्रो यांनी जोकोविचची तुलना थेट अनेक अफेअर्सची परंपरा असलेले गोल्फपटू टायगर वुड्स यांच्याशी केली. त्यामुळे या प्रकरणाला आणखी हवा मिळाली. भरीस भर म्हणजे जोकोविचच्या कोणे एके काळच्या गर्लफ्रेण्डने त्याचं नाव दीपिकासोबत जोडलं आहे.

नतासा बेकवालाक ही सर्बियन पॉपस्टार नोवाकसोबत डेटिंग करत होती. दीपिका पदुकोणला डेट करुन जोकोविच अधिक आनंदीच राहील, असं नतासाने सुचवलं.

टेनिस स्टार नोवाक जोकोविचसह दीपिका पदुकोण डिनर डेटवर!


गेल्या वर्षी लॉस अँजेलसमध्ये दीपिका आणि नोवाक यांना एका पंचतारांकित रेस्टॉरंटमध्ये डिनर करताना मीडियाने पाहिलं होतं. त्यानंतर दोघं एकाच कारमधून निघून गेले. नोवाकच्या अनेक प्रेयसींची नावं घेताना नतासाने दीपिकाचा उल्लेख केला होता.

यापूर्वी दीपिकाचं नाव क्रिकेटपटू युवराज सिंग, महेंद्र सिंग धोनी, रणबीर कपूर, रणवीर सिंग, सिद्धार्थ माल्या अशा अनेकांसोबत जोडलं होतं. मात्र यापैकी कोणासोबत तिचं अफेअर होतं, कोणाला तिने डेट केलं, कोणासोबत ती रिलेशनशीपमध्ये होती, याबाबत कुठलंच खात्रीलायक वृत्त नाही.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV