पाकिस्तानी क्रिकेटर उमर अकमलच्या मृत्यूची अफवा

पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल याचा अपघाती मृत्यू झाल्याची ही अफवा आहे.

पाकिस्तानी क्रिकेटर उमर अकमलच्या मृत्यूची अफवा

मुंबई: सोशल मीडियावर सध्या अफवांचं प्रमाण वाढलं आहे. या अफवा वेगाने व्हायरल होतात. अशीच एक अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटू उमर अकमल याचा अपघाती मृत्यू झाल्याची ही अफवा आहे. या पोस्टमध्ये उमर अकमलसारखाच दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो जोडण्यात आला आहे. त्याचा चेहरा रक्तबंबाळ झाल्याचं या फोटोत दिसतं.

मात्र या अफवेमुळे खुद्द उमर अकमल इतका वैतागला की त्याने स्वत: सोशल मीडियावर त्याबाबत स्पष्टीकरण दिलं. उमरने एक व्हिडीओ ट्विट करुन, आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं.

मी लाहोरमध्ये पूर्णत: सुरक्षित आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट ही अफवा आहे. मी नॅशनल टी 20 चषकाच्या सेमीफायनलमध्ये खेळणार आहे, असं उमरने व्हिडीओमध्ये सांगितलं.

https://twitter.com/Umar96Akmal/status/935212899383087105

https://twitter.com/Umar96Akmal/status/935496957161820160

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pakistan cricketer Umar Akmal declared ‘dead’ on social media
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV