पाकचे दोन दिवसात सलग तीन पराभव, भारतानेही धुतलं

अपंगांचा विश्वचषक, अंडर-19 विश्वचषक आणि न्यूझीलंड दौऱ्यात पाकिस्तानच्या संघांना सलग दोन दिवस सपाटून मार खावा लागला. विशेष म्हणजे, यात भारतीय संघाने देखील पाकिस्तानच्या संघाचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला.

पाकचे दोन दिवसात सलग तीन पराभव, भारतानेही धुतलं

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी कालचा आणि आजचा दिवस निराश करणारा ठरला. कारण, अपंगांचा विश्वचषक, अंडर-19 विश्वचषक आणि न्यूझीलंड दौऱ्यात पाकिस्तानच्या संघांना सलग दोन दिवस सपाटून मार खावा लागला. विशेष म्हणजे, यात भारतीय संघाने देखील पाकिस्तानच्या संघाचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला.

अंपगांच्या विश्वचषकात टीम इंडियाकडून पाकिस्तानचा खुर्दा

सध्या पाकिस्तान आणि दुबईमध्ये अपंगांचा क्रिकेट विश्वचषक सुरु आहे. या विश्वचषकात शुक्रवारी पाकिस्तान आणि भारत असा सामना रंगला. पण या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानच्या संघाला दणदणीत पराभव केला.

टीम इंडियाने टॉस जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. 40 षटकांच्या या सामन्यात पाकिस्तानने 8 गडी बाद 282 धावा केल्या. पण भारतीय संघाने हे लक्ष्य 34.5 षटकात सात गडी राखून साध्य केलं. टीम इंडियाच्या विजयात दीपक मलिकने 79 धावांची, तर व्यंकटेशने 64 धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली.

अंडर-19 क्रिकेट विश्वचषकात अफगाणिस्तानकडून पाकचा पराभव

दुसरीकडे अंडर-19 विश्वचषकातही पाकिस्तानच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. कारण, अंडर-19 विश्वचषकातील सामन्यात पाकिस्तानला अफगाणिस्तानच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरण्याचा निर्णय घेतला. यावेळी  पाकिस्तानच्या संघाने 47.4 षटकात 188 धावा केल्या. तर अफगाणिस्तानच्या संघाने हे लक्ष्य पाच गडी गमावून साध्य केलं.

न्यूझीलंड दौऱ्यातील तिसऱ्या वनडेत पाकचा दारुण पराभव

दरम्यान, पाकिस्तानच्या मुख्य संघालाही सपाटून मार खावा लागला. पाच वनडे आणि तीन टी-20 सामन्यांसाठी पाकिस्तानचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. आज सकाळी झालेल्या तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर 257 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ केवळ 74 धावांवरच गारद झाला.

सामन्याच्या सुरुवातीलाच न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज बोल्टने पाच चेंडूत तीन गडी बाद करुन, पाकिस्ताला जोरदार दणके दिले. त्याने एकूण 17 धावा देऊन पाच गडी बाद केले.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pakistan losses three international cricket matches on two days
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV