भारताचा न्यूझीलंडवर विजय, पाकिस्तान टी-20 मध्ये नंबर वन!

भारताविरुद्ध टी-20 मालिकेत पराभव स्वीकारावा लागल्यानं न्यूझीलंडला आपलं अव्वल स्थान गमवावं लागलं आहे.

भारताचा न्यूझीलंडवर विजय, पाकिस्तान टी-20 मध्ये नंबर वन!

मुंबई : आयसीसीच्या टी-20 टीम रॅकिंगमध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर विराजमान झाली आहे. भारताविरुद्ध टी-20 मालिकेत पराभव स्वीकारावा लागल्यानं न्यूझीलंडला आपलं अव्वल स्थान गमवावं लागलं आहे.

सध्या पाकिस्तानचे टी-20 मध्ये 124 गुण आहेत. तर न्यूझीलंडची 125 अकांवरुन 120 अकांवर घसरण झाली आहे. दरम्यान, या विजयामुळे भारताचा फायदा झाला आहे.  सध्या भारताचे 119 गुण आहेत. त्यामुळे भारत पाचव्या स्थानी कायम आहे. तर इंग्लडं चौथ्या स्थानावर आहे.

गोलंदाजांमध्ये न्यूझीलंड संघातील लेग स्पिनर ईश सोढी आणि ट्रेंट बोल्ट यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. सोढी आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच टॉप-10 मध्ये आला आहे. तर बोल्टनंही 16वं स्थान पटकावलं आहे. भारताच्या भुवनेश्वर कुमारच्या क्रमवारीत देखील सुधारणा झाली असून सध्या तो 26 व्या स्थानी आहे.

फलंदाजांमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा अद्यापही पहिल्या स्थानी कायम आहे. तर सलामीवीर रोहित शर्मा 21व्या आणि शिखर धवन 45व्या स्थानावर आहेत.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: pakistan on top of t20 ICC ranking latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV