'आमच्या फलंदाजांवर कोणीतरी जादूटोणा केला होता'

'आम्हाला पूर्ण विश्वास होता की, सेमीफायनलमध्ये सामना अटीतटीचा होईल. पण आमचे फलंदाज अवघ्या 69 धावांवर बाद झाले. टीमची ही स्थिती पाहून असं वाटलं की, कोणीतरी आमच्या खेळाडूंवर जादूटोणाच केला आहे.'

'आमच्या फलंदाजांवर कोणीतरी जादूटोणा केला होता'

कराची : अंडर-19 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताकडून पराभूत झालेल्या पाकिस्तानी संघाचा व्यवस्थापक नदीम खानने एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 'ज्या पद्धतीनं आमचा संघ पराभूत झाला. त्यावरुन असं वाटत होतं की, आमच्या संघावर कोणी जादूटोणा केला आहे.'

नदीम हा पाकिस्तानचा माजी कसोटीपटू असून सध्या तो पाकिस्तानी अंडर-19 संघाचा व्यवस्थापक आहे. न्यूझीलंडवरुन परतल्यानंतर त्याने भारताविरुद्धच्या पराभवावर आपली प्रतिक्रिया देताना तो म्हणाला की, 'आम्हाला पूर्ण विश्वास होता की, सेमीफायनलमध्ये सामना अटीतटीचा होईल. पण आमचे फलंदाज अवघ्या 69 धावांवर बाद झाले. टीमची ही स्थिती पाहून असं वाटलं की, कोणीतरी आमच्या खेळाडूंवर जादूटोणाच केला आहे.'

'असं वाटतं की, आमच्या फलंदाजांना कळतच नव्हतं की, मैदानावर नेमकं काय होतंय?, त्यामुळे परिस्थिती आणि दबाव हाताळणं त्यांना जमलंच नाही.' असंही नदीम म्हणाला.

टीम इंडियाने सेमीफायनल सामन्यात पाकिस्तानवर 203 धावांनी मात केली. या सामन्यात शुबमन गिलने शानदार शतक झळकावून 272 धावांपर्यंत मजल मारुन दिली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना संपूर्ण पाकिस्तानी संघ 69 धावांवरच बाद झाला.

राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने फायनलमध्येही ऑस्ट्रेलियावर मात करत विश्वचषक पटकावला.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: pakistan under 19 team manager bizarre statement latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV