पाकिस्तानी किक्रेटर्सकडूनही 'विरानुष्का'ला लग्नाच्या शुभेच्छा

लग्नानंतर संपूर्ण देशातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण फक्त भारतातूनच नव्हे तर पाकिस्तानी क्रिकेटर्सकडूनही विराट आणि अनुष्काला शुभेच्छा देण्यात येत आहेत.

पाकिस्तानी किक्रेटर्सकडूनही 'विरानुष्का'ला लग्नाच्या शुभेच्छा

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची मागील काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरु होती. अखेर काल (सोमवार) हे दोघंही लग्नाच्या बेडीत अडकले. यानंतर त्यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

लग्नानंतर संपूर्ण देशातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण फक्त भारतातूनच नव्हे तर पाकिस्तानी क्रिकेटर्सकडूनही विराट आणि अनुष्काला शुभेच्छा देण्यात येत आहेत.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीनं ट्विटरवरुन विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. ' विराट आणि अनुष्का लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ईश्वर तुम्हा दोघांना कायम सुखी ठेवो.'आफ्रिदीसोबतच उमर अकमलनंही विराट आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या. 'लग्नाच्या खूप शुभेच्छा... तुमचं प्रेम असंच कायम राहो.'

यावेळी रावलपिंडी एक्सप्रेस म्हणजेच शोएब अख्तरनंही ट्वीट करुन विरानुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत. 'आयुष्याच्या नव्या इनिंगसाठी दोघांना खूप शुभेच्छा'संबंधित बातम्या :

VIDEO : 'विरानुष्का'चं लग्न झालेलं 'हेच' ते खास ठिकाणं!

विराट-अनुष्काच्या लग्न आणि हळदीचा व्हिडिओ

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात!

विराट-अनुष्काच्या लग्नाचा पहिला फोटो!

दिल्लीत 21, तर मुंबईत 26 तारखेला 'विरानुष्का'च्या लग्नाचं रिसेप्शन

रब ने बना दी जोडी... 'विरानुष्का'ची लव्हस्टोरी

क्रिकेट आणि बॉलिवूडमधल्या नात्याची परंपरा

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: pakistani cricketers gives best wishes to virat and anushka latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV