‘बाप कौन है?’, पाकिस्तानी प्रेक्षकांनी टीम इंडियाला डिवचलं!

‘बाप कौन है?’, पाकिस्तानी प्रेक्षकांनी टीम इंडियाला डिवचलं!

नवी दिल्ली : टीम इंडियाचा दारुण पराभव करत पाकिस्तानी टीमने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. त्यानंतर दोन्ही संघांनी विजय आणि पराभव अत्यंत खिलाडूवृत्तीने घेतला. पाकिस्तानच्या विजयात टीम इंडियाचे खेळाडूही मोठ्या मनाने सहभागी झाले. मात्र, त्यानंतर मैदानावरुन ज्यावेळी टीम इंडिया ड्रेसिंग रुममध्ये परतत होती, त्यावेळी पाकिस्तानी प्रेक्षकांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न केला.

नेमकं काय घडलं?

मैदानावरील प्रेझेंटेशन सेरेमनी संपल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू ड्रेसिंग रुमकडे रवाना झाले. त्यावेळी पाकिस्तानी प्रेक्षकांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न केला. 'अकड़ टूट गई है कोहली सारी तेरी...अकड़ टूट गई है.' असे मोठमोठ्याने म्हणत पाकिस्तानी प्रेक्षक विराट कोहलीला डिवचत होते.

त्यानंतर, रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि धोनी ड्रेसिंग रुमकडे जात असताना, ‘बाप कौन है?.. बाप कौन है?’ अशा मोठमोठ्याने घोषणा देत होते.

मोहम्मद शमी संतापला!

पाकिस्तानी प्रेक्षकांच्या घोषणा ऐकल्यानंतर मोहम्मद शमी संतापला आणि ड्रेसिंग रुमकडे जात असताना थांबला. घोषणा देणाऱ्या प्रेक्षकाच्या दिशेने शमी रागाने आला. मात्र, मागून येणाऱ्या धोनीने त्याला थांबवलं आणि ड्रेसिंग रुमकडे घेऊन गेला.

एकंदरीत पाकिस्तानी टीम आणि टीम इंडियाने विजय-पराजय जितक्या खिलाडूवृत्तीने घेतले, तेवढं प्रेक्षकांनी घेतलेलं दिसून आले नाही.

पाहा व्हिडीओ :

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV