लाजिरवाण्या पराभवानंतर पाक खेळाडू सोशल मीडियावर ट्रोल

भारताविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या अंडर-19 संघातील खेळाडूंना सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं जातं आहे.

लाजिरवाण्या पराभवानंतर पाक खेळाडू सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई : अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर तब्बल 203 धावांनी मात केली. भारताच्या 272 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांवर बाद झाला.

पाकिस्तानच्या या लाजिरवाण्या पराभवाने अंडर-19 च्या संघावर बरीच टीका सुरु आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानी खेळाडूंना बरंच ट्रोल केलं जातं आहे.'एकाही पाकिस्तानी खेळाडूने 18 पेक्षा जास्त धावा केल्या नाही, त्यांना 'अंडर-19'चा खरा अर्थ समजला', अशी टिप्पणी एका ट्विटर यूजरने केली आहे.

पाकिस्तानच्या या पराभवानंतर एका यूजरने दोन फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोत पाकिस्तानाचा सीनियर संघ जेव्हा भारतासोबत विश्वचषकात हरतो त्यावेळी पाकिस्तानमधील नागरिक टीव्ही फोडतात. तर दुसऱ्या फोटोत अंडर-19 मधील पराभवानंतर पाकिस्तानी रिमोट फोडतात. असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

'पाकिस्तानविरुद्ध मोठी खेळी करणार याचा त्याला विश्वास होता'

शुबमन गिलचं नाबाद शतक, अनेक विक्रम नावावर

अंडर-19 विश्वचषक : पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Pakistani under 19 players troll on Social media after defeat with India latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV