पाकिस्तानच्या खेळाडूचा लाईव्ह सामन्यात आत्महत्येचा प्रयत्न

भविष्यात कधीही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळायला मिळणार नाही, या निराशेतून पाकिस्तानच्या युवा खेळाडूने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला

पाकिस्तानच्या खेळाडूचा लाईव्ह सामन्यात आत्महत्येचा प्रयत्न

लाहोर : संघात निवड न झाल्याने पाकिस्तानच्या एका युवा खेळाडूने प्रथम श्रेणी सामना चालू असताना आत्महत्येचा प्रयत्न केला. लाहोर क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात जाऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या क्रिकेटरचं नाव गुलाम हैदर अब्बास असं आहे.

गोलंदाज असलेल्या गुलाम हैदरने लाहोर सिटी क्रिकेट असोसिएशनच्या (एलसीसीए) मैदानात जाऊन अंगावर पेट्रोल ओतून घेतलं. त्यावेळी मैदानात कायदे-आजम ट्रॉफीतील सामना सुरु होता. गुलाम हैदर मैदानात जाऊन अंगावर पेट्रोल ओतून घेत असल्याचं पाहताच उपस्थितांनी त्याला रोखलं.

निवड समितीच्या आश्वासनांचा वैताग आला असल्याचं गुलाम हैदरचं म्हणणं आहे. भविष्यात कधीही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळायला मिळणार नाही, या निराशेतून त्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास गद्दाफी स्टेडिअमच्या प्रवेशद्वारावर आत्महत्या करु, असा इशाराही त्याने दिला.

आत्महत्या केली तर एलसीसीए प्रमुख त्याला जबाबदार असतील. कारण ते गुणवत्तेच्या आधारावर खेळाडूंची निवड करत नाहीत. एक संधी देण्याच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोपही गुलाम हैदरने केला. त्यामुळे निवड प्रक्रियेतून वारंवार बाद केल्याने निराशेतून या क्रिकेटरने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV