हार्दिक पंड्यासोबत अफेअरची चर्चा, परिणीती चोप्राचं स्पष्टीकरण

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा ट्विटरवरील संवाद पाहून दोघांच्या अफेअरचीही चर्चा सुरु झाली.

By: | Last Updated: > Monday, 4 September 2017 4:32 PM
parineeti clears on rumours about her and hardip pandya’s affairs

मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं जुनं नातं आहे. टीम इंडियाचे खेळाडू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या अफेअरचे अनेक किस्से आपण पाहिले आहेत.

नवाब मन्सूर अली खान, मोहम्मद अझरुद्दीन, युवराज सिंह आणि हरभजन सिंह असे टीम इंडियाचे अनेक खेळाडू बॉलिवूड अभिनेत्रींसोबत विवाहबद्ध झाले. तर अलीकडच्याच काळात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं अफेअरही चर्चेत आहे.

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा ट्विटरवरील संवाद पाहून दोघांच्या अफेअरचीही चर्चा सुरु झाली.

या दोघांच्या चर्चेची सुरुवात एका ट्वीटपासून झाली. परिणीतीने एक सायकलसोबतचा फोटो शेअर करत ‘परफेक्ट पार्टनरसोबत अमेझिंग ट्रिप’ असं कॅप्शन दिलं होतं.

हार्दिक पंड्याने या ट्वीटला रिप्लाय दिला. ”मी याचा अंदाज लावू शकतो का? बहुतेक ही क्रिकेट आणि बॉलिवूडची दुसरी लिंक आहे”, असं पंड्याने रिप्लायमध्ये दिलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं.

परिणीतीनेही पंड्याला रिप्लाय दिला. ”असं म्हणूही शकतो किंवा नाही, पण सध्यातरी सगळं रहस्य याच फोटोमध्ये दडलेलं आहे”, असं परिणीती म्हणाली.

ट्वीटच्या या चर्चेनंतर परिणीतीने एक व्हिडिओ शेअर करुन अखेर हा सर्व सस्पेंस दूर केला. आपण ज्या ‘अमेझिंग पार्टनर’विषयी बोलत होतो, तो शाओमीचा आगामी फोन आहे, असं परिणीतीने स्पष्ट केलं.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:parineeti clears on rumours about her and hardip pandya’s affairs
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सलमान खान लवकरच बाबा होणार?
सलमान खान लवकरच बाबा होणार?

मुंबई : बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान लग्न कधी करणार हा

व्हेंटिलेटरची ऑस्करवारी हुकल्याने प्रियंका चोप्राचा हिरमोड?
व्हेंटिलेटरची ऑस्करवारी हुकल्याने प्रियंका चोप्राचा हिरमोड?

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे न्यूटन चित्रपटाची अधिकृत एन्ट्री

नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : ‘फँड्री’, ‘सैराट’च्या यशानंतर मराठमोळा दिग्दर्शक

‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...
‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...

हैदराबाद : ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ सिनेमाला ऑस्कर नामांकन न

'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता
'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता

नवी दिल्ली : ‘पीपली लाईव्ह’ चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकी

1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत
1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या क्रीडा विषयावरील चित्रपटांचं वारं वाहू

न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट
न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवण्यात आलेल्या ‘न्यूटन’

'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा
'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा

मुंबई : संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’ सिनेमातील दीपिका

वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं
वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं

मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि गोविंदा यांच्यातील मतभेद वाढतच आहेत.

‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!
‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!

मुंबई : ‘न्यूटन’ सिनेमाची सर्वच स्तरातून कौतुक होत असताना, वादही