प्रो कबड्डीत पटनाची हॅटट्रिक, गुजरातला नमवून जेतेपद पटकावलं

पटना पायरेट्सच्या अंतिम सामन्यातल्या विजयात प्रदीप नरवाल आणि जयदीपनं निर्णायक कामगिरी बजावली.

प्रो कबड्डीत पटनाची हॅटट्रिक, गुजरातला नमवून जेतेपद पटकावलं

चेन्नई : पटना पायरेट्सनं गुजरात फॉर्च्युनजायंट्सचा ५५-३८ असा पराभव करून, सलग तिसऱ्यांदा प्रो कबड्डी लीगच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.

पटना पायरेट्सच्या अंतिम सामन्यातल्या विजयात प्रदीप नरवाल आणि जयदीपनं निर्णायक कामगिरी बजावली. प्रदीप नरवालनं चोवीस चढायांमध्ये तब्बल १९ गुणांची वसुली केली. जयदीपनं पकडींमध्ये पाच गुणांची नोंद केली.

गुजरातकडून सचिन आणि सुनीलकुमार यांनी पराभव टाळण्यासाठी शिकस्त केली. पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. सचिननं चढायांमध्ये अकरा, सुनीलकुमारनं पकडीत दोन गुणांची नोंद केली. या संपूर्ण मोसमात गुजरातनं उत्कृष्ट खेळ करत अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. मात्र, अंतिम सामन्यात पटना आपला खेळ उंचावून जेतेपदावर आपलं नाव कोरलं.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Patna Pirates beat Gujarat Fortunegiants in Pro Kabaddi Final latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV