पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान निलंबित

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान निलंबित

इस्लामाबाद : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निलंबनाची कारवाई केली आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या तपासानंतर मोहम्मद इरफानला निलंबित करण्यात आलं.

पाकिस्तान सुपर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणी इरफानची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी शर्जील खान आणि खालिद लतिफवर पीसीबीने आधीच निलंबनाची कारवाई केली होती.

इरफानने संशयित सट्टेबाजाशी संपर्क ठेवल्याचं कबूल केलं. मात्र त्याविषयी पीसीबीला त्याने माहिती दिली नव्हती.

या प्रकरणी पीसीबीने मोहम्मद इरफानला नोटीसही बजावली असून त्याची बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे.

या दरम्यान मोहम्मद इरफान निलंबितच राहिल. तो कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सहभागी होऊ शकत नाही. पीसीबीकडून त्याला चार्जशीटही देण्यात आली आहे. त्याच्यावर पीसीबीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV