स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पीसीबी दोन खेळाडूंची चौकशी करणार

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) पुन्हा एकदा स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीची नियुक्ती करण्याची शक्यता आहे.

By: | Last Updated: > Monday, 17 July 2017 8:41 AM
pcb to probe umar akmal mohammad sami over spot fixing

कराची : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) पुन्हा एकदा स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या दोन खेळाडूंचा स्पॉट फिक्सिंगमध्ये समावेश होता का, याची चौकशी पीसीबी करणार असल्याचं वृत्त आहे.

पीसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी न्यायाधिकरणाच्या सदस्यांच्या समक्ष इंग्लंडच्या राष्ट्रीय गुन्हे शाखेसमोर अधिकाऱ्याने चौकशीदरम्यान पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल आणि मोहम्मद समी यांचं नाव घेतलं, असं वृत्त ‘जंग’ने दिलं आहे.

या दोन्ही खेळाडूंनी पीसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी न्यायाधिकरणाच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे का, याची पडताळणी केल्याशिवाय त्यांना नोटीस पाठवता येणार नाही, असं बोर्डाच्या सूत्रांनी म्हटलं आहे.

अधिकाऱ्याने चौकशीदरम्यान दिलेल्या जबाबात या दोन्ही खेळाडूंच्या नावांचा उल्लेख आहे. शिवाय सट्टेबाज मोहम्मद युसूफनेही त्यांचं नाव घेतलं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

उमर अकमलला नुकतंच पाकिस्तानच्या संघातून पुन्हा एकदा वगळण्यात आलं आहे. वेस्ट इंडिज दौरा आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या काळात फिटनेसच्या कारणामुळे त्याला बाहेर बसवण्यात आलं होतं. तर मोहम्मद समी 2016 पासून पाकिस्तानकडून खेळलेला नाही.

Sports News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:pcb to probe umar akmal mohammad sami over spot fixing
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

हरमनप्रीतने पुरुषांच्या क्रिकेटमधील विक्रमही मोडला
हरमनप्रीतने पुरुषांच्या क्रिकेटमधील विक्रमही मोडला

डर्बी : कर्णधार मिताली राजच्या भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा

'हरमनप्रीत तू रॉक स्टार आहेस', देशभरातून कौतुकाचा वर्षाव
'हरमनप्रीत तू रॉक स्टार आहेस', देशभरातून कौतुकाचा वर्षाव

मुंबई: टीम इंडियानं काल (गुरुवार) ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी

...म्हणून हरमनप्रीत कौर वीरेंद्र सेहवागला आदर्श मानते!
...म्हणून हरमनप्रीत कौर वीरेंद्र सेहवागला आदर्श मानते!

डर्बी : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात

पीटरसन दक्षिण आफ्रिकेच्या संघातून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार?
पीटरसन दक्षिण आफ्रिकेच्या संघातून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार?

नवी दिल्ली : इंग्लंडचा दिग्गज खेळाडू केव्हिन पीटरसनने 2019 पर्यंत

धोनीचा नवा उद्योग, रांचीत दुकानाचं उद्घाटन
धोनीचा नवा उद्योग, रांचीत दुकानाचं उद्घाटन

रांची : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर फावल्या वेळेत

12 वर्षांनी भारतीय महिला संघ विश्वचषकाच्या फायनलमध्ये
12 वर्षांनी भारतीय महिला संघ विश्वचषकाच्या फायनलमध्ये

डर्बी : कर्णधार मिताली राजच्या भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा

हरमनप्रीतचं खणखणीत शतक, ऑस्ट्रेलियासमोर 282 धावांचं आव्हान
हरमनप्रीतचं खणखणीत शतक, ऑस्ट्रेलियासमोर 282 धावांचं आव्हान

डर्बी: महिला विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताने

चेन्नई ओपनचं नाव आता महाराष्ट्र ओपन, पुण्यात स्पर्धा खेळवणार!
चेन्नई ओपनचं नाव आता महाराष्ट्र ओपन, पुण्यात स्पर्धा खेळवणार!

मुंबई: भारतीय टेनिसची एकमेव एटीपी टूर्नामेंट चेन्नई ओपन आता यापुढे

महिला विश्वचषक : भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये पावसाचा व्यत्यय
महिला विश्वचषक : भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये पावसाचा व्यत्यय

डर्बी: महिला विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्याआधी डर्बीत

‘रवी शास्त्री नेहमीच सकारात्मक असतात’
‘रवी शास्त्री नेहमीच सकारात्मक असतात’

कोलकाता: ‘प्रशिक्षक रवी शास्त्री हे कायमच सकारात्मक असतात. यापुढे