प्रग्यान ओझा बेपत्ता, बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून शोध सुरु

बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अद्याप ओझाशी संपर्क झालेला नाही. त्यामुळे ओझाच्या नावाशिवायच बंगाल संघाची घोषणा करण्यात आली.

प्रग्यान ओझा बेपत्ता, बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून शोध सुरु

कोलकाता : टीम इंडियाचा कसोटी गोलंदाज प्रग्यान ओझा आणि बंगाल क्रिकेट असोसिएशन यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरु आहे. तणाव एवढा वाढला आहे की बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अद्याप ओझाशी संपर्कही झालेला नाही. त्यामुळे ओझाच्या नावाशिवायच बंगाल संघाची घोषणा करण्यात आली.

प्रग्यान ओझा बंगालकडून दोन सत्र खेळला. त्यानंतर त्याला हैदराबादला परतायचं होतं. मात्र बंगाल असोसिएशनने त्याला नाहरकत प्रमाणपत्र देण्यास मनाई केली. तेव्हापासून ओझाशी असोसिएशनचा अद्याप संपर्क झालेला नाही.

प्रग्यान ओझाशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्या नावाशिवायच संघ जाहीर करावा लागला, अशी माहिती बंगाल क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव अविषेक डालमिया यांनी दिली. ओझा त्याचे प्रशिक्षक साईराज बहुतुले यांच्या मार्गदर्शनाखालील सराव सत्रातही सहभागी झाला नव्हता.

बंगालचा 17 खेळाडूंचा संघ श्रीवत्स गोस्वामीच्या नेतृत्त्वात खेळणार आहे. नियमित कर्णधार मनोज तिवारी दुलीप ट्रॉफी खेळणार असल्यामुळे श्रीवत्स गोस्वामीच्या खांद्यावर नेतृत्त्वाची धुरा देण्यात आली आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV