विराट-अनुष्काच्या रिसेप्शनला पंतप्रधान मोदींची हजेरी

क्रिकेट आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गजही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.

विराट-अनुष्काच्या रिसेप्शनला पंतप्रधान मोदींची हजेरी

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा दिल्लीत पार पडतोय. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हजेरी लावली. क्रिकेट आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गजही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.

विराट आणि अनुष्काने पंतप्रधान मोदींना रिसेप्शनला येण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. विराट-अनुष्काच्या निमंत्रणाला मान देत मोदींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

लग्नाचा कार्यक्रम हा अत्यंत खाजगी पद्धतीने करण्यात आला असला तरी भारतात रिसेप्शनचा मोठा कार्यक्रम होणार आहे. 21 तारखेला म्हणजे आज दिल्लीत, तर 26 तारखेला मुंबईत जंगी रिसेप्शन होणार आहे. ज्यामध्ये बॉलिवूडमधील आणि क्रिकेटमधील दिग्गज हजर असतील.

या कार्यक्रमानंतर विराट कोहली नव्या वर्षात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. पाच जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. तर अनुष्काही शुटिंगला सुरुवात करणार आहे.

https://twitter.com/ANI/status/943859513106374657

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Prime Minister Narendra Modi at wedding reception of Virat Kohli & Anushka Sharma in Delhi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV