फुटबॉलवीर नेमारवर तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज!

पॅरिस सेंट जर्मेनचा हा सर्वात महागडा फुटबॉलवीर रिआल माद्रिदविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत खेळू शकणार नाही.

फुटबॉलवीर नेमारवर तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज!

ब्राझिलचा स्टार फुटबॉलवीर नेमारच्या दुखापतग्रस्त उजव्या पायावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. त्यामुळं पॅरिस सेंट जर्मेनचा हा सर्वात महागडा फुटबॉलवीर रिआल माद्रिदविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत खेळू शकणार नाही.

पॅरिस सेंट जर्मेननं रविवारच्या लीग वन सामन्यात मार्सेलीचा ३-० असा धुव्वा उडवला होता. त्याच सामन्यात नेमारच्या उजव्या पायाचा घोटा गंभीररित्या दुखावला होता. त्यानंतर झालेल्या चाचणीत त्याच्या उजव्या पायात फ्रॅक्चर असल्याचं आढळून आलं आहे. नेमारच्या याच दुखापतीवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

नेमार कमीत कमी सहा आठवडे फुटबॉल खेळू शकणार नाही, असं नेमारच्या वडिलांनी म्हटलं आहे.

नेमारला पॅरिस सेंट जर्मेनने 22.2 कोटी युरोला खरेदी करत आपल्या संघात घेतलं होतं. फुटबॉल जगतातील हा सर्वात मोठा करार होता.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: PSG confirm football star Neymar will have surgery this week
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV