कर्नाटकच्या शिवय्यावर मात, पुण्याचा अभिजीत कटके भारत केसरी!

पुण्याच्या अभिजीत कटकेनं कर्नाटकच्या शिवय्यावर 10-2 अशी मात करून ‘भारत केसरी’ हा मानाचा किताब पटकावला.

कर्नाटकच्या शिवय्यावर मात, पुण्याचा अभिजीत कटके भारत केसरी!

पुणे : पुण्याचा तरुण पैलवान अभिजीत कटके कर्नाटकातल्या जामखंडीत भारत केसरी किताबाचा मानकरी ठरला आहे. अभिजीत कटकेनं कर्नाटकच्या शिवय्यावर 10-2 अशी मात करून ‘भारत केसरी’ हा मानाचा किताब पटकावला.

51 हजार रुपये रोख आणि चांदीची गदा देऊन अभिजीतल गौरवण्यात आलं. विशेष म्हणजे या स्पर्धेतल्या पाचही कुस्त्यांमध्ये अभिजीतनं अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवला आहे.

अभिजीत कटकेनं गेल्या वर्षी पदार्पणातच उपमहाराष्ट्र केसरी व उपहिंद केसरी किताबांचा मान मिळवला होता. 2016 साली फ्रान्समध्ये झालेल्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यानं भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV