पीव्ही सिंधूची कोरिया ओपनच्या फायनलमध्ये धडक

पी. व्ही. सिंधूनं कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

पीव्ही सिंधूची कोरिया ओपनच्या फायनलमध्ये धडक

सोल (कोरिया) : भारताच्या ऑलिम्पिक आणि जागतिक रौप्यविजेत्या पी. व्ही. सिंधूनं कोरिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सिंधूनं चीनच्या बिंगजियाओवर 21-10, 17-21, 21-16 असा विजय मिळवला.

सिंधूनं पहिल्या गेममध्ये शानदार सुरुवात केली आणि 9-1 अशी बढत घेतली. पण नंतर काही चुका झाल्या पण तिची लय बिघडली नाही. त्यामुळे पहिल्या गेममध्ये सिंधूनं बिंगजियाओवर 21-10 असा विजय मिळवला.

पण दुसऱ्या गेममध्ये बिंगजियाओनं झोकात पुनरागमन करत सिंधूला जोरदार टक्कर दिली. पण सिंधूनं दुसरा गेम 17-21नं गमावला. मात्र, सामन्यातील तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये सिंधू चुका सुधारत बिंगजियाओवर 21-16 अशी मात करत सामनाही जिंकला.

अंतिम सामन्यात सिंधू जपानच्या नोझोमी ओकुहाराविरुद्ध भिडणार आहे. त्यामुळे पीव्ही सिंधू कोरिया सुपर सीरीज आपल्या खिशात घालणार का? याकडे सर्वांचं लक्ष असेल.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV