ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर दगडफेक, अश्विनने चाहत्यांना फटकारलं

गुवाहटीतील सामन्यात भारताचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर दगडफेक करण्यात आली. यावर टीम इंडियाचा फिरकीपटू आर. अश्विनने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर दगडफेक, अश्विनने चाहत्यांना फटकारलं

गुवाहटी : ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर काल रात्री उशिरा दगडफेक झाली. अज्ञाताने सामना संपल्यानंतर हॉटेलकडे जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाच्या बसच्या दिशेनं एक मोठा दगड भिरकावला. ज्यात बसचं नुकसान झालं. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अॅरोन फिंचने याबाबत ट्विट करुन माहिती दिली.

ऑस्ट्रेलियन संघाच्या बसवर दगडफेक केल्यामुळे टीम इंडियाचा फिरकीपटू आर. अश्विनने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आपण अशा देशात राहतो, ज्याची संस्कृती ‘अतिथि देवो भव’ आहे, असं अश्विनने म्हटलं आहे.

दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट्सने पराभव केला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ हॉटेलकडे जात होता. त्यावेळी बसवर दगड भिरकावण्यात आला. यामध्ये बसची काच फुटली.

या हल्ल्याचा फोटो अॅरॉन फिंचने ट्विट केला. “हॉटेलकडे जात असताना टीम बसच्या खिडकीवर दगड मारण्यात आला. हे खूपच भीतीदायक होतं”, असं फिंचने म्हटलं आहे.

गुवाहटीमध्ये सात वर्षांनी काल आंतरराष्ट्रीय सामना झाला. यापूर्वी या मैदानावर 2010 मध्ये सामना खेळवण्यात आला होता. सात वर्षांनी या मैदानात विजय पाहायला मिळेल, अशी आशा चाहत्यांना होती, मात्र पराभवामुळे चाहते नाराज झाले.

दरम्यान अरॉन फिंचचं ट्विट ऑस्ट्रेलियाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने रिट्विट केलं आहे.

संबंधित बातमी : ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमच्या बसवर दगडफेक

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV