300 विकेट्सपेक्षा 'ही' बातमी मोठी, अश्विन पत्नीकडूनच ट्रोल

अश्विनची पत्नी प्रितीने प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या साखरपुड्याची बातमी पोस्ट केली आहे.

300 विकेट्सपेक्षा 'ही' बातमी मोठी, अश्विन पत्नीकडूनच ट्रोल

मुंबई : कसोटी क्रिकेटमध्ये विकेट्सचं सर्वात जलद त्रिशतक साजरं करणाऱ्या आर अश्विनला त्याच्या बायकोनेच ट्रोल केलं आहे. या बातमीपेक्षाही प्रिन्स हॅरीचा साखरपुडा झाल्याची बातमी मोठी असल्याचं ट्वीट अश्विनची पत्नी प्रितीने केलं आहे.

'मला तुझ्या आनंदावर विरजण घालायचं नाही. किंवा तुझ्यावरचा प्रकाशझोत हिरावून घ्यायचा नाही. पण तुझ्या 300 विकेट्सच्या रेकॉर्डपेक्षाही काही वेगळं आहे बघ' अशा आशयाचं ट्वीट करत तिने प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या साखरपुड्याची बातमी पोस्ट केली आहे.

https://twitter.com/ashwinravi99/status/935052654417395714

ट्वीटमध्ये प्रितीने हार्टब्रेकचा इमोजी टाकला आहे. यावरुन प्रिन्स हॅरीच्या साखरपुड्यामुळे जगभरातील अनेक तरुणींप्रमाणेच प्रितीचंही हार्टब्रेक झाल्याचं दिसत आहे.

https://twitter.com/prithinarayanan/status/935089799286833152

ब्रिटनचे प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कलचा साखरपुडा


दिवंगत प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांचा धाकटे पुत्र प्रिन्स हॅरी यांचा साखरपुडा झाल्याची अधिकृत घोषणा सोमवारी करण्यात आली. अभिनेत्री मेगन मार्कलसोबत प्रिन्स हॅरी पुढच्या वर्षी विवाहबंधनात अडकणार आहेत.

54 कसोटी सामन्यांत विकेट्सचं त्रिशतक, अश्विनचा रेकॉर्ड!


कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद तीनशे विकेट्स घेण्याचा मान आता अश्विनच्या नावावर जमा झाला आहे. त्याने अवघ्या 54 कसोटी सामन्यांमध्ये विकेट्सचं त्रिशतक साजरं केलं.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: R Ashwin’s wife Priti trolls him on Twitter, says 300 wickets not as important as Prince Harry’s engagement news latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV