'या' फोटोमुळे राहुल द्रविडवर कौतुकाचा पाऊस!

हा फोटो 3100 पेक्षा जास्त वेळा रिट्वीट केला आहे, तर 6000 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. फोटो पाहून लोक द्रविडचं खूप कौतुक करत आहेत.

'या' फोटोमुळे राहुल द्रविडवर कौतुकाचा पाऊस!

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर राहुल द्रविड जेवढा शांत आणि संयमी मैदानात असायचा, तेवढाच मैदानाबाहेरही आहे. 44 वर्षीय द्रविडचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ज्यात तो आपल्या मुलांसोबत रांगेत उभा असल्याचं दिसत आहे.

हा फोटो एका विज्ञान प्रदर्शनाच्या बाहेरचा असल्याचं म्हटलं जात आहे. हजारो ट्विपल्सनी हा फोटो रिट्वीट केला आहे. राहुल द्रविडने मे, 2003 मध्ये लग्न केलं होतं आणि त्याला दोन मुलं आहेत.

एका ट्वीटर हॅण्डलवर शेअर केलेल्या फोटोमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड आपल्या मुलांसह रांगेत उभा आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "एका विज्ञान प्रदर्शनात आपल्या मुलांसोबत रांगेत उभा असलेला राहुल द्रविड. कोणताही दिखावा नाही, पेज-3 अॅटिट्यूड नाही, सेलिब्रिटी असल्याचा गर्व नाही, इतकंच काय तर मी कोण आहे माहिताय का? अशी अधिकारवाणी भाषाही नाही. इतर सामान्य आई-वडिलांप्रमाणे रांगेत उभा आहे."

https://twitter.com/in_southcanara/status/933635079699664896

हा फोटो जवळपास 5000 वेळा रिट्वीट केला आहे, तर सुमारे 10000 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. फोटो पाहून लोक द्रविडचं खूप कौतुक करत आहेत.

राहुल द्रविडच्या नावावर कसोटीत 13,288 धावा जमा आहेत. तर 344 वन डे सामन्यात त्याने 10,889 धावा केल्या आहेत.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Rahul Dravid’s photo goes viral, people talking about his simplicity
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV