या भारतीय क्रिकेटरला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

एक व्हिडीओ, जो व्हायरल करण्याची धमकी त्याला दिली जात आहे. राहुल शर्माने सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे.

या भारतीय क्रिकेटरला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

नवी दिल्ली : टीम इंडियासाठी खेळलेला फिरकीपटू राहुल शर्मा सध्या त्रस्त आहे. एक व्हिडीओ, जो व्हायरल करण्याची धमकी त्याला दिली जात आहे. राहुल शर्माने सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे.

''पैशांसाठी लोकं काहीही करतात. कुणाच्या जीवनाचं महत्व समजत नाही. एक अनोळखी व्यक्ती मला ब्लॅकमेल करतोय की, करिअर खराब करण्यासाठी एक व्हिडिओ व्हायरल करेन, देवा अशा लोकांपासून वाचव'', असं ट्वीट राहुल शर्माने केलं आहे.राहुल शर्मा यापूर्वीही चर्चेत आला होता. 2012 साली एका रेव्ह पार्टीमध्ये त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. याचा रिपोर्ट सकारात्मक आला होता. तेव्हापासून त्याच्या क्रिकेट करिअरलाही ग्रहण लागलं आहे.

राहुल शर्माने आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि पुणे वॉरियर्सचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2014 नंतर तो क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्येही खेळताना दिसला नाही. भारताकडून त्याने चार वन डे सामने आणि दोन टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर वन डेत 6 आणि टी-20 मध्ये 3 विकेट आहेत. 2012 मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने अखेरचा सामना खेळला होता.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: rahul sharma getting threats for ending his carrier
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: rahul sharma राहुल शर्मा
First Published:
LiveTV