श्रीलंकेला मोठा धक्का, तिसऱ्या कसोटीतून हेराथ आऊट

दुखापतीमुळे श्रीलंकेचे तीन खेळाडू यापूर्वीच या कसोटी मालिकेतून बाहेर झाले आहेत. श्रीलंकेला आता पुन्हा एकदा रंगना हेराथच्या रुपाने मोठा धक्का बसला आहे.

श्रीलंकेला मोठा धक्का, तिसऱ्या कसोटीतून हेराथ आऊट

कोलंबो : भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. संघातील सर्वात अनुभवी फिरकीपटू रंगना हेराथ पाठीच्या त्रासामुळे या मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत खेळू शकणार नाही.

श्रीलंकेचे तीन खेळाडू यापूर्वीच दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर झाले आहेत. हेराथला गॉल कसोटीतच दुखापत झाली होती. मात्र कोलंबो कसोटीसाठी तो फीट झाला. मात्र आता तिसऱ्या कसोटीला दुखापतीमुळे हेराथला मुकावं लागणार आहे.

श्रीलंकेविरुद्धची ही कसोटी मालिका भारताने यापूर्वीच 2-0 ने आपल्या नावावर केली आहे. त्यातच आता श्रीलंकेचा सर्वात महत्वाचा गोलंदाज संघात नसल्याने भारताकडे पुन्हा एकदा विजयाची संधी आहे.

पहिल्या कसोटीत भारताने 304 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या कसोटीत एक डाव आणि 53 धावांनी विजयाची नोंद केली.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV